पु.ल

हसत राहण्याचा मंत्र देणारं हे पुस्तक. आपल्या लाडक्या पु. ल. देशपांडे यांनी शाब्दिक विनोदाची पखरण करीत दिवस आनंदात घालवण्याचं जणू तंत्रच आपल्याला शिकवलं आहे. माझं खाद्यजीवन, बिगरी ते मॅट्रिक, माझे पोष्टिक जीवन, पाळीव प्राणी अशा कथांमधून पु. ल. चा निखळ, खळखळता विनोद पानोपानी आपल्या भेटीला येतो. पण त्याही आधी आपल्याला भेटते ती त्यांची सही आणि त्यांनी वाचकांशी केलेलं हितगुज. ते लिहितात, ‘जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्या मध्ये पकडून नियतीने चालवलेली आपल्या साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची ‘हसवणूक’ करण्यापलीकडे आणखी काय करायचं?’

Advertisements

व पू.

मन मोकळं करण्याचं सगळ्यात योग्य ठिकाण

देवाचिये दारी

उत्तराखंडात झालेल्या निसर्गाच्या कोपाच्या बातम्या कानोकानी आहेतच, पण याचि देही याचि डोळा अनुभव घेतलेले पटेल भाई बोलू लागले तेव्हा विदारकता जास्त विदृप होत गेली. पटेल भाई आणि त्यांचे कुटुंब दर्शनाला गेले असताना आलेलं हे संकट त्यांना जीवाचा घोर लावून गेलं

मागच्यावर्षी पटेल भाईंनी नवीन फ़्लॅट घेतला, मुलगा शिकायला लंडनला गेला, मुलगी यंदा नवव्या वर्गात,भाभीजी गृहिणी..असं हे सुखवस्तु कुटुंब…नेहाच्या जन्मापासूनची आमची ओळख! भाई भाभी आणि नेहा दर्शनाला गेले…येताना मात्र भाई एकटेच परतले आहे…भाभी दिल्लीला माहेरी आहेत, आजारी आहेत आणि नेहा कुठे गेली कळतच नाही…

खूप शोध घेऊन झाला..अजूनही सुरू आहे..पण न तिचा मृतदेह मिळत न ती….पटेल भाई कळवळून बोलतात…देवा, आमची नेहा जिवंत नसेल तर तसं तरी कळू दे…निदाम एकदाचा अंत होईल या वाट पाहण्याचा, काळजी करण्याचा….आणि जिवंत असेल तर हाती लागू दे सुखरुप!!

एका तरुण मुलीच्या बापाला, आजारी बायकोच्या नव-याला, आणि परदेशी असलेल्या, आणि (मुद्दाम) काहीही न कळवलेल्या मुलाच्याही बापाला सावरायला शक्ती देणारा तो इश्वर इतकं घोर संकट का घेऊन येतो?

पटेल भाई हमसाहमशी रडतात तेव्हा जीव कासावीस होतो….मला देवाला माफ़ करण्याची मूभा असेल तर मी त्याला कधीच माफ़ करणार नाही….असे भाव त्यांच्या डोळ्यात असतात…

देवाचिये द्वारी उभा क्षणभरी……पण ह्या पटेल भाईला या दुखातून मुक्त कर रे बाप्पा….

फ़ुकाराम वाचाळ

व्यसन रिकामटेकडेपणाचं

आजकाल बेरोजगारी वाढली आहे हे जरी खरं असलं तरी हे रिकामे लोक दारू किंवा ईतर तत्सम प्रकारांच्या व्यसनात वेढलेले आढळतात, मात्र हे व्यसन उच्चभ्रू लोकांच्या “रिकामटेकड्या” व्यसनासारखं नसतं… खरं तर व्यसन ते व्यसन..मग कोणतही का असेना…

पण आजकालची मंडळी  व्यसनात अडकलेली आहे ते टेक्नोलॉजी मुळे..या व्यसनाला आपण टॅक्नोलोजिकल व्यसन असही म्हणू शकतो. यात सोशल नेटवर्किंग साईट हे एक मोठं व्यसन आहे. या व्यसनात अडकलेल्यांच्या काही कॅटेगरीज असू शकतील.

१) उगाच करायला काहीच नाही म्हणून इथे वेळ घालवणे…हे लोक इतके रिकामे कसे असतात हा मला प्रश्न पडतो…आपण कधीही विचारा, हे ऑनलाईन असतातच

२) खूप काम असतं तरी रात्री किंवा संध्याकाळी उगाच “फ़्रेश वाटावं” म्हणून नियमीतपणे इथे वेळ घालवणे…यापेक्षा आराम केला तर काय हरकत आहे?..पण नाही..व्यसनच हे

३)फ़ॅशन म्हणून आधी करून पाहणे आणि मग व्यसन लागणे.. ह्या लोकांना ह्या साईट्स बद्दल आधी फ़ारसं माहित नसतं…मग मित्र मैत्रीण झाले की ह्या साईट्स च्या “लीला” त्यांना भांडावून सोडतात…आणि ही साईट एक्सप्लोअर करणे हेच यांचे ध्येय असते

४) फ़क्त डेटींग साठी नवीन नवीन मुलं मुली शोधणे…हे लोक कमालीचे असतुष्ट असतात की काय अशी माझी शंका आहे…रोज नवीन नवीन मुलामुलींची चित्र, फ़ोटो पाहून त्यांना फ़्रेंडलिस्ट मधे अ‍ॅड करून घेणे हाच यांचा उद्देश असतो..यांचे हजारांच्या वर मित्र मैत्रिणी असतात..त्यातल्या किती लोकांना हे ओळखत असतील काय माहित?

५) कोणता अभिनेता किंवा आभिनेत्री काय ट्वीट करत आहे यात यांचा ईन्ट्रेस्ट. यांना स्वत:च मत नाही

६) दुस-याच्या आयुष्यात काय सुरू आहे हे पहाणारे हे व्यसनी स्वत:च आयुष्य या साईट्स पुरतच मर्यादित ठेवतात…तो तिला काय म्हणाला..हा कुठे गेला…तिचा नवरा कसा आहे, त्याची बायको कुठे काम करते…हेच धंदे करत बसतात

७) काही लोक आपण अति विद्वान असल्याचा आव आणून इतरांना “फ़ुका” चे सल्ले देतात किंवा भाष्य करतात..( माझ्या ब्लॉग च नाव “फ़ुका म्हणे” आहे विसरू नये)

८) काही लोक साहित्य प्रेमी असल्याचे दर्शवत असतात…कायम कविता, लेख, पुस्तकं यांच्याबद्दल बोलतात..काही तर इथे येऊन सहित्यिक बनतातही! त्यांना काय तो फ़क्त पुरस्कार द्यायचं बाकी असतं..

९) आता महत्वाची मंडळी..सोफ़्टवेअर इंजीनिअर….एक प्रोग्राम अपलोड/डाऊनलोड ला टाकला की बसले ट्विटर किंवा फ़ेस्बुक वर!..हे लठ्ठ पगाराचे व्यसनी….जवळ जवळ ९०% सॉफ़्टवेअर वाले लोक या कॅटेगरीत येतात

१०) वाचक…अधाशासार्ख जे मिळेल ते वाचत सुटणारे लोक अगदी शीव्या जरी दिल्या तरी आनंदाने वाचतील असे असतात..

तुमची कॅटेगरी कोणती?

फ़ुकाराम वाचाळ